मुंबई।नगर सहयाद्री- सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता उर्फी अनोख्या कारणामुळे पुन्हा एकद...
मुंबई।नगर सहयाद्री-
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता उर्फी अनोख्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीच्या कपड्यांवर अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. अशातच आता तिच्यावर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. अभिनेता फैजान अन्सारी याने धक्कादायक विधान केल्याने वादाला तोंड फुटलं आहे.
“उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी आहे. ती ज्या पद्धतीने बोलते. जसे कपडे घालते, यावरुन हे सिद्ध होतं. ती तृतीयपंथी असल्याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचं तुमच्या लक्षात येईल,” असं अन्सारीने म्हटलं आहे.तुम्ही तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचं तुमच्या लक्षात येईल, असं धक्कादायक वक्तव्य फैजान अन्सारीने केलंय.
तृतीयपंथी असल्याचं उर्फीने स्वत: मान्य करावं अन्यथा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचंही अन्सारी म्हणाला आहे. याआधी अन्सारीने उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. याबाबत त्याने उर्फीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. “उर्फी जावेद मुंबईचं वातावरण दुषित करत आहे. तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत”, असं अन्सारी म्हणाला होता.
COMMENTS