जळगाव।नगर सहयाद्री - जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली येथे धक्कादायक बातमी समोर अली आहे. एक युवक बुलेटने जात होता. त्याचा पाठलाग करत बुलेरो करत ह...
जळगाव।नगर सहयाद्री -
जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली येथे धक्कादायक बातमी समोर अली आहे. एक युवक बुलेटने जात होता. त्याचा पाठलाग करत बुलेरो करत होती. बुलेरोने बुलेटला धडक दिली. बुलेरोने बुलेटला लांबवर घसडत नेले. त्यामुळे तिथं काय सुरू आहे, हे कुणाला कळलेच नाही. पण, त्यानंतर हल्लेखोरांनी शस्त्र काढले. त्या तरुणावर सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार,पाचोरा तालुक्यातल्या अंतुर्ली येथील सचिन पाटील या तरुणाची भातखंडे गावानजीक हत्या करण्यात आली. ही घटना भातखंडे गावाजवळ घडली. अंतुर्लीतील युवक आहे सचिन पाटील होता, तेवढ्यात हल्लेखोर बुलेरो गाडीने पाठलाग करत आले. बुलेरोने सचिनच्या बुलेटला जोरदार धडक दिली. त्यानंतर बुलेटला लांबवर घसडत नेले. यात सचिन जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर गाडीतून खाली उतरले. सचिनवर धारधार शस्त्राने वार केले. यात सचिनचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटला बुलेरोने धडक मारून फरफटत नेले. धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. याविषयी पुढील पाचोरा पोलीस तपास करीत आहेत.
COMMENTS