हिंगोली। नगर सहयाद्री - हिंगोली मध्ये भयंकर घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. तरुणाने लग्नास नकार दिल्याने तृतीयपंथीयाने तरुणाची हत्या केल्...
हिंगोली। नगर सहयाद्री -
हिंगोली मध्ये भयंकर घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. तरुणाने लग्नास नकार दिल्याने तृतीयपंथीयाने तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर संबंधित तृतीयपंथीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सदर घटनेतील तृतीयपंथी आरोपी प्रिया नरसिंग तूरमळू उर्फ दीपक नरसिंग तुरमळू व मृत तरुण अशोक गजानन आठवले हे गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र राहत होते. त्याच्यामध्ये प्रेमसंबंध होते. मात्र दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे कारण म्हणजे अशोक आठवले या तरुणाने नरसिंगसोबत राहण्यास तसेच लग्न करण्यासही नकार दिला.
संतापाच्या भरात प्रिया उर्फ नरसिंगकडून अशोक आठवलेचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी खून करणारा तृतीयपंथी आरोपी प्रिया नरसिंग तूरमळू उर्फ दीपक नरसिंग तुरमळू याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
COMMENTS