चंद्रपूर \ नगर सहयाद्री - चंद्रपूर जिल्हामधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भद्रावती तालुक्यात मांगली या गावात जगन्नाथ बाबा मठ प्रसिद्ध आहे...
चंद्रपूर \ नगर सहयाद्री -
चंद्रपूर जिल्हामधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भद्रावती तालुक्यात मांगली या गावात जगन्नाथ बाबा मठ प्रसिद्ध आहे. मंदिरात चोरी करण्याचा अनुषंगाने काल मध्यरात्री आलेल्या चोरट्यांनी मठामधील दोन ज्येष्ठ नागरिकांची सब्बलने वार करत निर्घृणपणे हत्या केली आहे.त्यानंतर मंदिरातील दान पेटी घेऊन पसार झाले आहे. दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, काल २२ मार्च गुढपाडव्याच्या दिवशी मध्यरात्री ही घटना घडली आली आहे. चंद्रपूर जिल्हामधील जगन्नाथ बाबा मठ येथे अज्ञात दरोडेखोरांनी मठात मध्यरात्री प्रवेश केला.दानपेटी फोडण्याचा आवाज येत असल्याने बापूजी खारकर (७२) व मधुकर खुजे (७५) त्याचा हा प्रकार लक्षात आला त्यानी दरोडेखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला. विरोध करत असताना दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करत असताना सब्बलने वार करीत हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.ही घटना दानपेटीच्या चोरीतून झाली की अन्य काही कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.दरोडेखोरांनी दोन्ही वृद्धांना खाटेवर टाकत दानपेटी घेऊन पसार झाले आहेया दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मांगली गाव हादरुन गेले आहे.
COMMENTS