अहमदनगर | नगर सह्याद्री- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणार्या संबंधित संचालकांसह पक्षाचे जिल्हाध...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणार्या संबंधित संचालकांसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचीही हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीयुवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी शुक्रवारी येथे केली. दरम्यान, या मागणीसह जिल्हा बँकेत झालेल्या राजकारणाबाबत पक्षाच्या जिल्ह्यातीलप्रमुख पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ मुंबईला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याभेटीसाठी जाणार असल्याचे तसेच जिल्हा बँकेत जे संचालक फुटले, त्यांच्याविरोधात अकोले, श्रीरामपूर, कर्जत व श्रीगोंद्यात आंदोलने केली असून दोनदिवसात या संचालकांची नावे जाहीर केली जातील, असेही पवार व कोळगे यांनी स्पष्ट केले.
मागील गुरुवारी (८ मार्च) झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्याअध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे संचालक शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव करून अध्यक्षपद पटकावले. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे १४ व भाजपकडे६ मते असताना कर्डिले यांना १० मते व घुले यांना ९ मते मिळाली. एक मत बादझाले. यातून महाविकास आघाडीचे पाचजण फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. हेपाचजण नेमके कोण आहेत, हे अजून गुलदस्त्यात असले तरी पक्षाचे नगरचे निरीक्षक अंकुशकाकडे यांनी संबंधित संचालकांना जाब विचारण्याचे आवाहन जिल्ह्यातील पक्षाच्याकार्यकर्त्यांना केले आहे.
या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादीचे पवार व कोळगेयांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली व पक्षाच्या फुटलेल्या चार संचालकांनानिलंबित करावे व जिल्हाध्यक्ष फाळके यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.हे चार संचालक कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे व त्यामुळेच अकोले, श्रीरामपूर,कर्जत व श्रीगोंद्यात आंदोलने सुरू आहेत. पण येत्या दोन दिवसात त्या संचालकांचीनावे जाहीर केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्ञानेश्वर साखरकारखान्याचे संचालक अशोक मिसाळ व शिवाजी कोलते तसेच पक्षाचे नेवाशाचे विधानसभाअध्यक्ष दादासाहेब गंडाळ उपस्थित होते.
COMMENTS