मुंबई। नगर सहयाद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत मा...
मुंबई। नगर सहयाद्री -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत माहीमच्या खाडीत धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा केला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी एका महिन्यात माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामा पाडा, नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू, असा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झाल्याचे दिसत आहे. हा वाद आणखी चिघळण्यापूर्वी मजारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे. पालिकेचे पथक आज सकाळीच हातोड, दोरखंड आणि घमेली घेऊन माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले.
माहीमच्या खाडीतील अनधिकृत बांधकामावर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांनी काल हे बांधकाम पाडण्याची मागणी करताच काल रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पथकाचीही स्थापना करण्यात आली होती. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेवर आश्चर्य व्यक्त होत आहे.
COMMENTS