अहमदनगर | नगर सह्याद्री कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात रेल्वे पटरी नजिक एका गाळ्यात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कोतवाली पोलिसांनी छापा टाक...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात रेल्वे पटरी नजिक एका गाळ्यात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. हुक्का पार्लरच्या मालकासह तेथील कामगार व हुक्का पिणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे. हुक्का पार्लरचा मालक ओंकार संतोष शिंदे (वय १९ रा. साईराम सोसायटी, कल्याण रोड), कामगार किरण अनिल शेळके (वय २३ रा. भावनाऋषी सोसायटी, कल्याण रोड), शुभम पंकज खंडेलवाल (वय १८ रा. गंजबाजार), प्रथम पराग गुजर (वय १८ रा. गुलमोहर रोड), रोहित राकेश दहिवाळ (वय १९ रा. नालेगाव), ऋषीकेश चंद्रशेखर पुंड (वय १९ रा. बालिकाश्रम रोड), भावेश संदीप गांधी (वय १९ रा. चाणय चौक, बुरूडगाव रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागात एका गाळ्यात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, महिला उपनिरीक्षक मुगडे, महिला अंमलदार गलांडे, अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, गाढे, संदीप थोरात, राऊत, मिसाळ, हिवाळे यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने बुधवारी रात्री दोन पंचासमक्ष तेथे छापा टाकून कारवाई केली.
COMMENTS