अहमदाबाद | वृत्तसंस्था- ३१ मार्चपासून जगातील सर्वात मोठी श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएल स्पर्धेचा सोळावा हंगाम सुरु होणार आहे. या हंगामात १० संघ...
अहमदाबाद | वृत्तसंस्था-
३१ मार्चपासून जगातील सर्वात मोठी श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएल स्पर्धेचा सोळावा हंगाम सुरु होणार आहे. या हंगामात १० संघ सहभागी झाले असून, २८ मे पर्यंत खेळवल्या जाणार्या संपूर्ण हंगामात ७४ सामने होणार आहेत. ही स्पर्धा ५८ दिवस चालणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये होम आणि अवे फॉरमॅट खेळवण्यात येणार आहे सर्व १० संघांना ७ सामने होम आणि ७ सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळावे लागणार आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भरवशाचा अष्टपैलू डीजे ब्रावोची संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचा सलामी सामना चार वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि आयपीएल २०२२ चा विजेता गुजरात टायटन्स संघांमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. आयपीएल २०२२ मधील निराशाजनक कामगिरी मागे सारूनआयपीएलची नव्याने सुरुवात करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने कर्णधारपद धोनीकडे सोपवले आहे.
दोन्ही संघांमध्ये मागील हंगामात २ साखळी सामने खेळवण्यात आले होते. या दोन्ही सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघ मैदानात उतरणार आहे. मात्र यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे डीजे ब्रावो , रॉबिन उथप्पा आयपीएलमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची पोकळी भरून काढण्याचे आव्हान धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोर असणार आहे. याशिवाय आयपीएल लिलावात सर्वात दुसरा महागडा खेळाडू ठरलेला बेन स्ट्रोस , काईल जेमिसन दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत.रविंद्र जडेजा संघाचा उपकर्णधार असणार आहे.
चेन्नई संघासाठी आनंदाची बाब म्हणजे गोलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ असलेला दीपक चाहर दुखापतीवर यशस्वी मात करून आयपीएलमध्ये परतला आहे. चेन्नई संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि अजिंय रहाणे, डेवीन कॉन्व्हे येण्याचीशयता आहे. तर दुसरीकडे अहमदाबादच्या होम ग्राउंडवर आयपीएल १६ ची थाटात सुरुवात करण्यासाठी डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात विजयी सलामी देण्यासाठी सज्ज असणार आहे.
चेन्नई संघाप्रमाणे गुजरात टायटन्स संघात केन विलियम्सन , शिवम मावी नव्याने दाखल झाले आहेत. संघाचे उपकर्णधारपद रशीद खानकडे असणार आहे. गुजरात टायटन्स आपले विजेतेपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये आपला अखेरचा सामना खेळणार आहे. आपल्या कर्णधाराला विजयी निरोप देण्यासाठी चेन्नई उत्सुक असणार आहे.
COMMENTS