मुंबई/नगर सह्याद्री - गेल्या काही वर्षांत यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार वाढले आहेत .या व्यवहारामुळे खिशातून रोकड चोरीचे प्रमाण घटले असले तर...
मुंबई/नगर सह्याद्री -
गेल्या काही वर्षांत यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार वाढले आहेत .या व्यवहारामुळे खिशातून रोकड चोरीचे प्रमाण घटले असले तरी सायबर गुन्ह्यात मात्र वाढ झाली आहे. ऑनलाईन व्यवहारामुळे सुट्ट्या पैशांची चिंता मिटली पण तेच बरे होते असे म्हणण्याची वेळ अली आहे .सायबर चोरट्यांनी नव्या युक्त्या शोधून यूपीआय वापरकर्त्यांना गंडवण्यास सुरुवात केली आहे .
गंडवण्याची नवी पद्धत चोरांनी शोधली आहे.ग्राहकांमध्ये जागरुकता नाही त्याचा गैरफायदा घेत ८१ जणांना तब्बल १ कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. ग्राहकाच्या खात्यात चुकून पेमेंट झाल्याचा दावा करून ते फसवणूक करतात तसेच लाखोंचा गंडा घालतात.
चोरटे आधी लोकांच्या खात्यात थोडे पैसे पाठवतात. नंतर यूपीआय वापरकर्त्यांना तुमच्या खात्यात चुकून पैसे आलेत, ते परत द्या अशी विनंती फोनवर करतात. ग्राहकाने पैसे परत केल्सास बँक खात्याचे सारे तपशील, केवायसीशी संबंधित माहिती, आधार, पॅन कार्डचा तपशील चोरट्यांच्या हाती लागतो.त्यातूनच फसवणूक केली जाते.सायबर फ्रॉड करणाऱ्यांचा फोन आल्यास त्याला मी माझ्या बँकेला सांगितलं आहे, एवढाच मेसेज त्याला द्या पैसे परत देऊ नका.
COMMENTS