खासदार सुजय विखे पाटील ;सुजित झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा पारनेर | नगर सह्याद्री सुपा औद्योगिक वसाहतीत महिंद्रा अँड महिंद्...
खासदार सुजय विखे पाटील ;सुजित झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा
पारनेर | नगर सह्याद्री
सुपा औद्योगिक वसाहतीत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा नवीन प्रकल्प लवकरच येणार असून तालुयातील व जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. आगामी बाजार समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे व सत्ता ताब्यात घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वासुंदे (ता.पारनेर) येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा, जलजीवन मिशन योजनेंतर्गत चार कोटी ५० लाख रूपयांच्या पाणी योजनेचे भूमिपूजन व जिल्हा सहकारी बँकेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष
शिवाजी कर्डिले, सुजित झावरे, वसंत चेडे, राहुल शिंदे, सुदेश झावरे, सचिन वराळ, अॅड. बाबासाहेब खिलारी, राजेश भंडारी, अश्विनी थोरात, अमोल साळवे, शिवाजी खिलारी, सुनील थोरात, योगेश रोकडे, दत्तात्रेय पवार, सुशिला ठुबे, स्वप्निल घुले, सुखदेव पवार, मनोज मुंगसे, पंकज कारखिले, सुरेश पठारे, विलास झावरे, अरूण ठाणगे, बापू भापकर, बाळासाहेब रेपाळे, शहरप्रमुख किरण कोकाटे, स्वप्निल राहिंज, सरपंच सुमन सैद, उपसरपंच शंकर बर्वे, सेवा संस्थेचे नारायण झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र झावरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, मी सुचना केली वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करा. पहिला वाढदिवस असा आहे ज्यात दोन महत्वाच्या घोषणा करणार आहे. जनतेला काही तरी देता येईल. आमच्या मनात कधी शंका नाही, की तुमच्यामागे लोक आहे की नाही. वसंतराव झावरे यांचे खूप मोठे योगदान आहे, हे कोणी विसरणार नाही. तीन वर्षांपूर्वी ओळख झाली, मात्र ते कायम बरोबर राहिले. सत्तेसाठी खूप लोक गेली, मात्र एकमेव माणूस की तो मागे राहीला. त्यांना त्रास दिला. सत्तेच्या जोरावर पोलीस प्रशासन, तहसीलदारांचा वापर करून केस केल्या. तरी हा माणूस माझ्या मागे राहिला, एकनिष्ठ आहे. माझे् कान पितळाचे नाही. कोणी काहीही सांगू, आम्हाला जे दिसते ते आम्ही पाहतो. सत्ता नसली तरी ही मोठी गर्दी झाली. सुजितराव, तुमचा सार्थ अभिमान गोरगरीब जनतेला आहे. विकासकामे करता याचा अभिमान आहे.
१५ वर्षे सत्ता नाही, मात्र आता परिवर्तनाची लाट आहे. बाजार समितीत सत्ता येणार. सत्ता हिसकावून आणावी लागते. कर्तृत्त्वातून आणावी लागते. येणार्या बाजार समिती निवडणुकीत सत्ता आणा. प्रत्येक निवडणूक गोरगरीब जनतेच्या जीवावर लढवणार. चांगल्या लोकांना, तरूणांना संधी द्यावी लागेल. त्यांच्या हातात सत्ता द्यावी लागेल. तालुयाला परिवर्तनाची गरज. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. वाळु तस्करांच्या टक्क्यांवर जगणारे आम्ही नाही. आम्हाला पैशाचा मोह कधीच झाला नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ५ ब्रास वाळु फुकट देणार. महाविकास आघाडीचा प्रपंच तस्कराच्या जिवावर चालला होता.
्जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले, वसंतराव झावरे यांचा आदर्श सुजित यांनी पुढे नेला. सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही आहोत. सत्ता नसताना ही गर्दी सांगून जाते सुजित यांचे काम चांगले आहे. कार्यकर्त्यांची खदखद लक्षात आली ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेऊ. मी आणि विखे बरोबर असू तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आमचा शब्द डावला जात नाही. वाढदिवसानिमित्त सुजित झावरे यांनी २५ कोटी रूपयांची कामे मागितली ही चांगली बाब आहे. तुमच्या पक्षाने तुम्हाला फसविले. उपाध्यक्ष असताना अनेक वेळा संघर्ष केला.
सुजित झावरे म्हणाले, सुजय विखे यांनी आग्रह केल्याने कार्यक्रम घेतला. मतभेद निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. तालुयातील लोकांनी विखे कुटुंबावर फार प्रेम केले. मोठे मताधिय दिले. वसंतराव झावरे यांच्या काळात तालुयात अनेक ठिकाणी पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठे प्रकल्प झाले. मांडओहळ, काळु धरण यासह अन्य कामे झाली. त्यानंतर मोठे प्रकल्प झाले नाही. लोकांच्या अपेक्षा बदल्या आहेत. सोशल मीडिया, केक कापणे हे चुकीचे आहे. माझ्या स्वभावात ते बसत नाही. तेरा वर्षे झाले एकही सत्ता नसतानाही माझी धास्ती कशाला घेता? टिका का करता? टिका करणार्यांवर वसंतराव झावरे यांनी कायम प्रेम केले. २०१९ ला थांबा बोलले, इतर लोक निवडून आले. बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. दादा संत होते, मी नाही. त्यांना खुप लोकांनी फसविले. ही सर्व लोक विकासकामांमुळे टिकली. ताकद द्या, विकासकामे द्या. आमदारकी नशिबात असेल तर मिळेल.
शिंदे- फडणवीस वेगवान सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. सर्व समाजाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले. साकळाई मार्गी योजना मार्गी लागेल. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची फार मोठी जबाबदारी आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेणार. खावटी कर्ज देण्याचे काम करणार असल्याचे शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. कारखानदारांची बँक म्हणून असलेली ओळख पुसून शेतकर्यांची बँक म्हणून होत आहे. जिल्हा बँकेत पारदर्शक भरती करणार आहे. कोणीही त्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करू नका, असे आवाहन कर्डिले यांनी केले.
COMMENTS