पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील वडनेर हवेली येथील सरपंच लहू रामदास भालेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत ...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील वडनेर हवेली येथील सरपंच लहू रामदास भालेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपकडून आपली उमेदवारी दाखल केली आहे. सहाय्यक निबंधक गणेश औटी यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
साडेचार वर्षांपूर्वी लहू भालेकर यांची जनतेतून सरपंच पदी निवड झाली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात जि.प.माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या माध्यमातून वडनेर हवेली येथे कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. बाजार समितीत आपली उमेदवारी दाखल करत त्यांनी तालुयाच्या राजकारणात प्रवेश केला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी भाजपकडून तरुण व नवख्या उमेदवारांना संधी देण्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार सरपंच लहू भालेकर यांना उमेदवारी दिली आहे.
गुरु राष्ट्रवादीत शिष्य भाजपात...
वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर यांचे राजकीय गुरु म्हणून पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांच्याकडे पाहिले जात असून बेलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु त्यांचे शिष्य लहु भालेकर यांनी मात्र बाजार समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ‘शिष्य भाजपमध्ये, गुरु राष्ट्रवादीत’ अशी चर्चा तालुयात रंगली आहे.
COMMENTS