नवी दिल्ली वृत्तसंस्था- मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील शोभापूर गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांची मुलगी घरातील ब...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील शोभापूर गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन महिन्यांची मुलगी घरातील बाथरूममध्ये बादलीत मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. मुलीचा मृतदेह बादलीत होता आणि बादलीवर झाकण होते. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली. तपासाअंती जे सत्य उघड झालं, त्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, बाथरुममधील बादलीत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी चौकशी दरम्यान अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. चिमुकली बादली पडली कशी? आणि बादलीवर झाकण कसे? याचा थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी संशयाच्या आधारे घराजवळील एका भिकाऱ्यालाही ताब्यात घेतले. तसेच मुलीच्या आई-वडिलांवरही संशयाची सुई होतीच. पोलिसांनी तपास केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा घरातील 4 वर्षे आणि 6 वर्षाच्या दोन बहिणींकडे वळवला.
पोलिसांनी या दोघींना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सर्व घटना सांगितली आणि दुर्घटनेमागचे सत्य उलगडले. त्या दिवशी काय काय घडले ते बहिणींनी सर्व सांगितले. आई स्वयंपाक करत असताना त्या त्यांच्या बाहुली सोबत खेळत होत्या. खेळून झाल्यावर मुलींनी बाहुलीला अंघोळ घातली. त्यानंतर या बहिणींच्या डोक्यात त्यांच्या 2 महिन्यांच्या बहिणीला बादलीत आंघोळ घालण्याची कल्पना आली.
दोघींनी दोन महिन्यांच्या बहिणीला पलंगावरून उचलून बाथरूममध्ये आणले. त्यांनी तिला बादलीच्या काठावर आंघोळ घालायला सुरुवात केली. दुर्दैवाने, यावेळी चिमुकली त्यांच्या हातून निसटली आणि बादलीत पडली. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही दोन्ही मुली तिला बाहेर काढू शकल्या नाहीत. घाबरून त्यांनी बादलीचे झाकण लावले आणि बाथरूममधून बाहेर गेल्या.
काही वेळाने मुलगी बेडरुममध्ये नसल्याचे आईच्या लक्षात आले. तिने वडिलांना फोन करुन मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासादरम्यान पण पोलिसांनी घराची झडती घेतली असता बाथरुममधील बादलीत मुलीचा मृतदेह आढळून आला.
COMMENTS