मुंबई / नगर सहयाद्री - गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शे...
मुंबई / नगर सहयाद्री -
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान देणं, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आम्ही सरकारला प्रश्न विचारत शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी आम्ही करत होतो. पण कृषिमंत्री हे असंवेदनशील आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सरकारने कांदाला शेतकऱ्यांना फक्त 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान देणं, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.
शेतकऱ्यांची मागणी होती की, 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावं. पण आम्ही बोलत होतो 500 रुपये प्रति क्विंटल तरी अनुदान द्यावं. पण त्यांनी ते दिलं नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात टिंगल टवाळी करणारी वक्तव्य या सरकारकडून होत आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे काय?”, असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.
COMMENTS