नवी दिल्ली | वृत्तसंस्था- केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिं...
नवी दिल्ली | वृत्तसंस्था-
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
उज्जला योजनेअंतर्गत वर्षभरात 12 गॅस सिलिंडर दिले जातात. मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवीन अधिसूचनेनुसार सांगितलं की, उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात 12 सिलिंडर देण्यात येतात. उज्जला योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांच्या अनुदान मिळते म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, 1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत.
COMMENTS