अहमदनगर | नगर सह्याद्री तपासणीसाठी काढुन नेलेले वीज मिटर पुन्हा बसवून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना सहायक अभियंता (वर्ग २) कम...
अहमदनगर | नगर सह्याद्री
तपासणीसाठी काढुन नेलेले वीज मिटर पुन्हा बसवून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना सहायक अभियंता (वर्ग २) कमलेश युवराज पवार याला अटक करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे या घटनेतील तक्रारदारांचे अंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टला त्यांनी महावितरणच्या चिचोंडी पाटील येथील वीज उपकेेंद्रातून वीजजोड घेतला आहे. मीटरमध्ये काहीतरी छेडछाड केली म्हणून हे मीटर तपासणीकरिता पवार याने काढून नेले होते.
तेच मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी आरोपी पवार याने तक्रारदाराकडे वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांना देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करुन २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. या संदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली. लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी पवार याने तक्रारदाराकडून २० हजार हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
नगर तालुका पोलीस ठाण्यात ३० मार्चला रात्री उशीरा गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक शरद गोरडे, पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राधा खेमनार, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांनी ही कारवाई केली.
COMMENTS