दिल्ली /नगर सह्याद्री अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट बेपत्ता आहेत. घटनास्थळी सर्च ऑपरेश...
दिल्ली /नगर सह्याद्री
अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळून हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट बेपत्ता आहेत. घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु आहे.सकाळी बोमडिलाजवळ ही घटना घडली .
हेलिकॉप्टर मिसामारीच्या दिशेने निघाले होते. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि को-पायलट होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, ऑपरेशन सॉर्टीसाठी चित्ता हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. सकाळी 9.15 च्या सुमारास एअर ट्रॅफिक कंट्रोलशी त्याचा संपर्क तुटला.ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर 'चित्ता'चा अपघात झाला होता. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता. तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला होता. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाला होता. गेल्या पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
COMMENTS