जालना:नगर सह्याद्री पत्नी दुसऱ्या पुरुषाबरोबर राहिल्याच्या रागातून पतीने सासऱ्यालाच गोळ्या घातल्याची घटना तालुक्यातील रामगव्हाण येथे घडली....
जालना:नगर सह्याद्री
पत्नी दुसऱ्या पुरुषाबरोबर राहिल्याच्या रागातून पतीने सासऱ्यालाच गोळ्या घातल्याची घटना तालुक्यातील रामगव्हाण येथे घडली.
अंबड तालुक्यातील पाचोड येथे स्थायिक झालेल्या किशोर शिवदास पवार याचा अंबडच्या पंडित भानुदास काळे यांच्या मुलीसोबत १२ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.काळे हे पवारांचे मामा आहेत. किशोर पवार यांना चार मुलेही झालेली आहेत.
किशोरची पत्नी काही दिवसांपासून मुलांना आणि घर सोडून पाचोड येथील एका पुरुषासोबत राहू लागली. पत्नी संसार व ४ अपत्ये सोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहू लागल्याने किशोरचा राग अनावर झाला. तिला सासरा पंडित काळे याने चिथावणी दिल्याचा संशय किशोर पवारच्या डोक्यात होता. याच रागातून तो मित्रांना घेऊन सकाळी अंबडला आला व सासऱ्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी डोक्यात तर एक पाठीत लागली. या घटनेत पंडित काळे यांचे जागीच निधन झाले. गोळीबारानंतर किशोर व त्याच्या मित्र फरार झाले.
COMMENTS