पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकदिलाचे व एकजीवाचे असून रसद बिसद काही नसते. आगामी निवडणुकी...
पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकदिलाचे व एकजीवाचे असून रसद बिसद काही नसते. आगामी निवडणुकीत या रसदवाल्यांना आपण घरी पाठविणार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केला. शेतकर्यांच्या हितासाठी बाजार समितीवर सत्ता मिळवायची असून नाशिक, निफाड बाजार समितीच्या धर्तीवर पारनेर बाजार समिती करायची आहे, असा मानस आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
व्यापारी मतदारसंघातून बहुजनांना संधी द्या
व्यापारी मतदारसंघातून मारवाडी समाजाचे दोन्ही प्रतिनिधी निवडणून येतात. त्यामुळे यापुढील काळात व्यापारी मतदारसंघातील उमेदवारीत बहुजन समाजातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी व्यापारी उमेदवारांना इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी बांधून घेतले पाहिजे, असे मत अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले. व्यापारी मतदारसंघातील निवडणूक गुंतागुंतीची झाली आहे. परंतु आगामी निवडणुकीत त्यामध्ये दुरुस्ती महत्वाची असल्याचे आमदार नीलेश लंके म्हणाले.
बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक मंगळवारी दुपारी झाली. यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव रासकर, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, खंडु भुकन, मारूती रेपाळे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, प्रशांत गायकवाड, नगराध्यक्ष विजय औटी, माजी सभापती सुदाम पवार, कारभारी पोटघन, मेजर बा. ठ. झावरे, दीपक लंके, दादा शिंदे, रा. या. औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, बबलू रोहकले, राहुल झावरे, विजय पवार, सचिन पठारे, किरण पठारे, अनिल गंधाक्ते, भागुजी दादा झावरे, सखाराम औटी, भाऊसाहेब भोगाडे, बाळासाहेब पुंडे, बाळासाहेब खिलारी, शिवाजी लंके,
COMMENTS