पारनेर | नगर सह्याद्री पारनेर-नगर मतदारसंघातील ३० कामांना मे २२ अखेर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकिय मान्यता मिळाली होती. त्याच ...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर-नगर मतदारसंघातील ३० कामांना मे २२ अखेर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकिय मान्यता मिळाली होती. त्याच कामांना तांत्रिक मान्यता मिळून निविदा कार्यवाही झाली होती; परंतु ८ जुलैला शासन स्तरावरुन या कामाना स्थगिती देण्यात आली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके व त्यांच्या सहकार्यांनी पुणे येथील अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता मृद व जलसंधारण प्रादेशिक कार्यालयासमोर सोमवारी उपोषण सुरू केले.
पारनेर-नगर मतदारसंघातील ३० कामांना मे २२ अखेर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकिय मान्यता मिळाली होती. परंतु ८ जुलैला शासन स्तरावरुन या कामांना स्थगिती देण्यात आली. ऑटोबर २०२२ मध्ये शासनाने स्थगिती उठवली होती. पण मंजूर कामांची निविदा प्रक्रिया झालेली नाही.जलसंधारण महामंडाळातील इतर तालुयातील कामांची निवीदा प्रक्रिया प्रगतीत असताना माझ्या मतदार संघातीलच कामांना जाणीवपूर्वक टाळण्यात येत असल्याचे आ. लंके यांनी सांगितल
प्रसंगी न्यायालयात जाईल : आ. लंके म्हणाले
पारनेर मतदारसंघातील अनेक दुष्काळी गावांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडुन ३० कामांना मंजुरी दिली होती. परंतु राजकीय सुडापोटी ही कामे अडवून ठेवली. सर्वसामान्यांच्या व विकासाच्या कामांमध्ये राजकारण होता कामा नये. त्यामुळे पुणे येथील मृद व जलसंधारण कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण चालू केले असून न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा आ. नीलेश लंके यांनी दिला आहे.
मतदारसंघातील ही कामे जोपर्यंत सुरू होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा आमदार लंके यांनी घेतला आहे. यावेळी अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, कारभारी पोटघन, परिवर्तन फौंडेशनचे सचिन भालेकर, सुहास शेळके, डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक भूषण शेलार, सुभाष औटी, माजी सरपंच ठकाराम लंके, बबलु रोहकले, जितेश सरडे, सतीश भालेकर, राहुल खामकर, बाजीराव कारखिले, अभय नांगरे, सचिन गवारे, अप्पा गवारे, राहूल गायकवाड आदी उपस्थित होते.
परिवर्तन फाउंडेशनचा आमदार लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा
पारनेर तालुयातील परिवर्तन फाउंडेशनने आ. लंके यांच्या उपोषणाला सोमवारी अध्यक्ष सचिन भालेकर व सुहास शेळके यांनी पाठींबा व्यक्त केला. कुणाच्या आदेशाने ही कामे अडवले आहेत, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सचिन भालेकर यांनी यावेळी केली.
COMMENTS