अहमदनगर | नगर सह्याद्री- बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास थेट नगरपर्यंत पोचला आहे. मुंबईच्या पोलीस पथकाने काल रात्री अहमदनगर जिल्ह्यात रुई...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास थेट नगरपर्यंत पोचला आहे. मुंबईच्या पोलीस पथकाने काल रात्री अहमदनगर जिल्ह्यात रुईछत्तीशी येथे मोठी कारवाई करत तेथून एका मुख्याध्यापकासह ५ जणांना अटक केली. प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून ते व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रूपयांना विक्री केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तीच प्रश्नपत्रिका दादर येथील परीक्षा केंद्रावर पकडल्याने हा प्रकार उजेडात आला.
मुंबईच्या या पथकाने त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यात तपास करताना अहमदनगर जिल्ह्यातील धागेदोरे हाती लागले. त्यानुसार पथक नगर तालुयातील रूईछत्तीशी गावात आले. तेथून किरण दिघे, अर्चना भामरे, भाऊसाहेब अमृते, वैभव तरटे, सचिन महारनवर यांना ताब्यात घेऊन मुंबईला नेले. मुख्याधापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक केली आहे. १२ वीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबईत दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तिथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करताना पोलिसांना याचे धागेदोरे अहमदनगरच्या रूईछत्तीशी गावात असल्याचे आढळले. येथे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठवले. फोडलेल्या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
COMMENTS