मुंबई /नगर सह्याद्री जागतिक आरोग्य संघटनेकडून मीठाबाबत एक अहवाल आला असून जास्त मीठ खाणे हे अनेक आजारांचे कारण असल्याचे सांगितले गेले आहे....
मुंबई /नगर सह्याद्री
जागतिक आरोग्य संघटनेकडून मीठाबाबत एक अहवाल आला असून जास्त मीठ खाणे हे अनेक आजारांचे कारण असल्याचे सांगितले गेले आहे.जर वेळीच पावले उचलली गेली नाहीत, तर येत्या 7 वर्षांत मिठामुळे होणाऱ्या आजारांमुळे सुमारे 70 लाख लोकांना जीव गमवावा लागेल.अशी गंभीर परिस्थिती ओढवेल.
जागतिक मीठ जागरूकता सप्ताह 14 ते 20 मार्च या कालावधीत साजरा केला जातो. त्यामुळे हा अहवाल दिला आहे . 2030 पर्यंत लोकांच्या आहारातील मिठाचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी करण्याचे WHO चे उद्दष्ट आहे.मीठामध्ये सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही असतात. मानवी शरीरात पाण्याची योग्य पातळी निर्माण करण्यापासून सोडियम सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि इतर पोषक द्रव्ये पोहोचवण्यास मदत करते. यामुळे, आपल्या रक्तवहिन्यासंबंधी आरोग्य, मज्जातंतूमध्ये ऊर्जा येते.मीठ कमी खाल्ल्यानेही कमी रक्तदाब,टाइप 2 मधुमेह ,अशक्तपणा आणि उलट्याची समस्या,
मेंदू आणि हृदयात सूज,जळजळ, डोकेदुखी, कोमा आणि झटके देखील येऊ शकतात,शरीराच्या अवयवाला जेवढी रक्ताची गरज असते तेवढ्या प्रमाणात रक्त पोहोचत नाही, एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉल 4.6% वाढते, म्हणून शरीरात मिठाचे योग्य संतुलन राखणे फार महत्वाचे आहे.
COMMENTS