अहमदनगर | नगर सह्याद्री महापालिकेच्या बंद झालेल्या सावेडी कचरा डेपोत सोमवारी रात्री उशिरा व मंगळवारी दुपारी असे सलग दोन दिवस आग लागली. मंगळव...
अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेच्या बंद झालेल्या सावेडी कचरा डेपोत सोमवारी रात्री उशिरा व मंगळवारी दुपारी असे सलग दोन दिवस आग लागली. मंगळवारी दुपारी लागलेली आग ऑसिजन प्लॅन्टच्या जवळ पोहोचल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांसह डेपोतील कर्मचार्यांची धावपळ उडाली. आग आटोयात आणल्याने ऑसिजन प्लॅन्ट थोडयात बचावला.
सावेडी कचरा डेपोच्या जागेत काही जुना कचरा पडून आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. गवताशेजारीच नव्याने ऑसिजन प्लॅन्टची उभारणी करण्यात आली आहे. हा प्लॅन्ट अद्याप कार्यरत झाला नाही. मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास कचरा व गवताला आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच
पथकाने आग आटोयात आणली. त्यानंतर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा गवताला आग लागली. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांकडून ही आग विझवली. मात्र, ही आग ऑसिजन प्लॅन्टजवळ पोहोचल्याने धावपळ उडाली. ऑसिजन प्लॅन्टला पुन्हा आगीची झळ पोहोचू नये, यासाठी जेसीबी मागून गवत व प्लॅन्ट यामध्ये चर खोदण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
COMMENTS