नवी दिल्ली /नगर सह्याद्री गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानने त्यांच्या समाजाची माफी मागायला हवी. नाहीतर सलमानला त्याच्याच हिशोबाने उत्त...
नवी दिल्ली /नगर सह्याद्री
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानने त्यांच्या समाजाची माफी मागायला हवी. नाहीतर सलमानला त्याच्याच हिशोबाने उत्तर देणार आहे
बिश्नोई म्हणाला, आमच्या समाजात त्याच्या विरोधात खूप राग आहे. आमच्या समाजाला त्याने खूप कमीपणा दाखवला. त्याने कधीच आमच्या समाजाची माफी मागितली नाही. इतक्या वर्षांपर्यंत त्याच्यावर खटला चालला.मी फक्त आपले विचार मांडले कधी अपराध करायचा असेल तर तेही करू.“आम्ही आमच्या परिसरात जीव हत्या करू देत नाही, वृक्ष कापू देत नाही. त्याने आमच्या परिसरात येऊन जिथे बिश्नोई समाजाची संख्या जास्त होती, तिथे येऊन शिकार केली. त्यामुळे आमच्या समाजात राग होता. त्याने आमची माफी मागावी, अशी आमची इच्छा होती. त्याच्याविरोधात लहानपणापासून माझ्या मनात राग आहे. कधी शक्य झालं तर त्याला त्याच्याच हिशोबाने उत्तर देऊ” अशी धमकी त्याने दिली.
COMMENTS