पारनेर | नगर सह्याद्री- तालुयातील भाळवणी येथील महिला कुस्तीपटू लावण्या गोडसें पुण्यातील वारजे येथील आमदार नीलेश लंके महीला किताबाच्या मानक...
पारनेर | नगर सह्याद्री-
तालुयातील भाळवणी येथील महिला कुस्तीपटू लावण्या गोडसें पुण्यातील वारजे येथील आमदार नीलेश लंके महीला किताबाच्या मानकरी ठरली आहे. पै. लावण्या गोडसे व पै सिद्धी घिसरे पुणे यांची मंगळवारी वारजे पुणे येथे झालेल्या स्पर्धेत अटीतटीची लढत झाली त्यात लावण्या गोडसे विजयी होऊन लोकनेते महिला किताब २०२३ पटकावत मानाच्या गदेची मानकरी ठरली. पै. लावण्या गोडसे हिस एनआयएस कुस्ती कोच किरणराव मोरे, महाकाल कुस्ती संकुल पीसोळी, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.
पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार आमदार नीलेश लंके यांचा दहा मार्च रोजी होणारा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. आमदार लंके यांच्यावर प्रेम करणारा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात राज्यभर पसरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार लंके यांच्या वाढदिवसा निमित्त मंगळवारी लोकनेते महिला कुस्ती किताब २०२३ चे वारजे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये ७० मुलींनी सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढवली. मानाच्या गदेसाठी भाळवणी गावातील कन्या पै. लावण्या प्रमोद गोडसे या पैलवान कुमारीकेने पुणे जिल्ह्यतही कुस्तीच्या माध्यमातुन यश संपादीत करत लोकनेता महिला कुस्ती किताब २०२३ ची मानकरी ठरली आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून अनिता इंगळे, सायलीताई वांजळे, लक्ष्मीताई दुधाने, आरतीताई वांजळे, हलिमाताई शेख कार्यक्रमाचे आयोजन आशाताई सुभाष वांजळे व लोकनेते आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधीकारी, कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. अमित दादा बैलभरे, पै. निलेश भाऊ वांजळे, तुषार नरसाळे, अभय नांगरे, राज शिनारे, संगिता बैलभरे, रूपालीताई चाकणकर, राणीताई लंके यांच्या हस्ते ही मानाची गदा देत पै.गोडसे हिस महिला कुस्ती किताब देत सन्मानित करण्यात आले आहे.
COMMENTS