ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे उभ्या असलेल्या ट्रकला मिनी ट्रकची धडक बसली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे उभ्या असलेल्या ट्रकला मिनी ट्रकची धडक बसली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. मृत्यु झालेले सातही जण पश्चिम बंगालचे होते. जाजपूरचे पोलिस अधीक्षक विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जाताना मृत्यू झाला. एसपी म्हणाले, 'आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली असून ते जाजपूरला येण्यास निघाले आहेत.
धर्मशाला पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राकेश त्रिपाठी यांनी सांगितले की, धुक्यामुळे शनिवारी पहाटे कोलकाताहून भुवनेश्वरला पोल्ट्री माल घेण्यासाठी जाणारा मिनी ट्रक एनएच-१६ वर नेउलापूर परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला धडकला.
जाजपूरचे जिल्हाधिकारी चक्रवर्ती सिंह राठोड यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह जाजपूर जिल्ह्यातील बरचना सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले.
COMMENTS