महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव आयएएस अधिकारी यांचा दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये ऍलर्जीची लक्षणे आढळल्याने मृत्यू झाला.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून कार्यरत असलेल्या ५७ वर्षीय भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी यांचा दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये ऍलर्जीची लक्षणे आढळल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी संध्याकाळी सचिव प्रशांत दत्तात्रेय नवघरे काळा घोडा परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, रात्रीचे जेवण करत असताना त्यांना ऍलर्जीची काही लक्षणे निर्माण झाली आणि ते जागेवरच कोसळले. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS