मुंबई/ नगर सह्याद्री - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप या दोन ...
मुंबई/ नगर सह्याद्री - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप या दोन नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणात संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांच्यावरच आरोप केले आहेत .राऊत म्हणाले महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढून घेण्यात आली. त्यामुळे माझ्या जीवितास धोका आहे. कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद चिघळला होता त्यावेळीही संजय राऊत यांनी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली होती.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी एक पत्र लिहिलं आहे.
राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव टाकले असून श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला हल्ल्याची सुपारी दिली असल्याचे म्हटले आहे .
कोग्रेसचे नेते , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीहि असेच पत्र नांदेड पोलिसांना दिले आहे. माझ्यावर कुणातरी पाळत ठेवत आहे.एक व्यक्ती माझ्या बैठका आणि दौऱ्यांच्या माहितीचे संकलन करत असून माझा घातपात करण्याचा डाव आहे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS