मुंबई /नगर सह्याद्री- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केल्यानंतर त्यां...
मुंबई /नगर सह्याद्री-
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्या मागणीला चक्क भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने पाठिंबा दिला आहे . नुसता पाठिंबा दिला असता तर वेगळे पण आयोग पक्षपातीपणा करतो हे देखील मान्य केले आहे.
ठाकरे यांनी आयोगावर टीका करताना निवडणूक आयोग विकले गेले आहे. शिवसेना पक्षाविषयी आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे. प्रत्यक्ष निवडणुका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यांनी म्हटले आहे की , निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी योग्य आहे . कारण आयोगाचे कामकाज संशयास्पद आहे. स्वामी हे भाजपचे ५ वेळा खासदार राहिले आहेत. ते सरकारमध्ये कायदा व न्याय मंत्री होते.
निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्याकडून शपथपत्र, प्रतिज्ञापत्र मागितले. पण त्यानंतरही आमदार, खासदारांच्या संख्येवर निर्णय दिला हे योग्य नाही .
COMMENTS