अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी स्टारर आयकॉनिक कॉमेडी चित्रपट 'हेरा फेरी ३' चे शूटिंग मंगळवारी म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून सुरू झाले.
मुंबई / नगर सह्याद्री -
अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी स्टारर आयकॉनिक कॉमेडी चित्रपट 'हेरा फेरी ३' चे शूटिंग मंगळवारी म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून सुरू झाले, ज्यामध्ये प्रोमो शूट करण्यात आला. त्याचवेळी आता शूटिंग सेटवरील कलाकारांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय, परेश आणि सुनीलची पहिली झलक या छायाचित्रात पाहायला मिळत आहे. वृत्तानुसार, हा फोटो चित्रपटाच्या प्रोमोचा आहे.
फोटो समोर आल्यानंतर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतो. अक्षय कुमारच्या या चित्रपटात एंट्री झाल्याने चाहते खूप खूश आहेत. 'हेरा फेरी ३'चे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र लवकरच याची घोषणा होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे बोलले जात आहे.
COMMENTS