मुंबई । नगर सह्याद्री - उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागून एक धक्के...
उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागून एक धक्के बसत आहे. आधी ४० आमदार सोडून गेले,त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गेली, आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणही गेल आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून दूर जात कॉंग्रेस आणि एनसीपीच्या पाठिंब्याने सरकारची स्थापना केली आहे. तेव्हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी हा एक धक्कादायक निर्णय होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे. परंतु हा निर्णय त्याच्यासाठी नंतर किती कठीण जाईल याची कल्पना त्यांना नव्हती.
उद्धव ठाकरे यांचा हाच निर्णय मान्य नाही असं म्हणत अडीच वर्षांनी शिवसेनेतील ४० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केली आहे. या बंडखोरीने उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणही गेल आहे. उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु बुधवारी सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
उद्धव ठाकरेंसाठी अडचणी इथेच थांबत नाहीत. उद्धव ठाकरे यांची कमी झालेली राजकीय ताकद त्यांच्या आणखी अडचणी निर्माण करु शकते. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सारखे मित्रपक्ष या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने हळूहळू उद्धव ठाकरे यांना टाळू देखील शकतात. मुख्यमंत्रीपदासाठी तर राष्ट्रवादीकडून नावे देखील समोर येत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळी शिवसेनेची ताकद सर्वाधिक होती. मात्र सध्याची स्थिती अगदी उलट आहे. आगामी निवडणुकांमध्ये वाटाघाटींदरम्यान ठाकरे गटाची बार्गेंनिग पॉवरही कमी होऊ शकते.
याशिवाय बीएमसी निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी पहिले सर्वात मोठे आव्हान आहे. मुंबई महापालिकेवर मागील 25 वर्षांपासून राज्य केले आहे. परंतु ती शिवसेना ठाकरे कुटुंबातील होती. आता शिवसेना एकनाथ शिंदेची बनली आहे. पुढील काही महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होईल. तिथे उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे.
ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढल्या!
राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून याचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण मशाल चिन्ह परत मिळावं यासाठी आता समता पार्टीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. विशेष म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांची समता पार्टीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. ही भेट घेतल्यानंतर समता पार्टीच्या नेत्यांकडून सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हाबद्दल याचिका दाखल करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात दिलं आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मशाल हेच चिन्ह ठाकरे गटाला वापरावे लागणार आहे. त्यानंतर समता पार्टीने याबद्दलची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
COMMENTS