मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याला काही भावाच नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जीवापाड...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याला काही भावाच नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जीवापाड कष्ट करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहे. दरम्यान, हाच मुद्दा विरोधकांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लावून धरला आहे. या मुद्द्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यासह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.
या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना, राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. सभागृहातील भावना आणि शेतकऱ्यांच्या कांद्याची परिस्थिती आपल्या लक्षात आली आहे. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारे सरकार आहे. म्हणून आम्ही निकर्ष आणि नियम डावलून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकारपूर्णपणे पाठीशी उभे आहे. आता नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरू झाली नसेल ती सुरू केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना दिले आहे. दरम्यान, शिंदेंनी यांनी ही माहिती देताच, विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले आहे. मुठभर व्यापाऱ्यांसाठी सरकार चालतं का? डबल इंजिनचे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार? असा सवाल विरोधकांनी सभागृहात उपस्थित केला आहे.
COMMENTS