मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री देवे...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहित होते. याबाबत अजित पवार यांना विचारा असा गौप्यस्फोट केला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.
आता शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी एक मोठे विधान केले आहे. अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजनेवाले को इशारा काफी है, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत अप्रत्यक्षरित्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? समजनेवाले को इशारा काफी है, असा अप्रत्यक्षरित्या टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी मोठं विधान केलं होतं. पहाटेच्या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होते. त्यांच्या संमतीनेच सगळे झाले होते. पण नंतर त्यांनी धोका दिला असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. एवढंच नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
फडणवीसांच्या या दाव्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार पुन्हा संतापले. मला याबद्दल काहीही बोलायचे नाही, माझा स्वभाव तुम्हाला माहित नाही. मला तो विषय काढायचा नाही, जुनं उकरून काढण्यात अर्थ नाही. मी मनकवडा नाही, पुढे फडणवीस मीटींग ला भेटले की मी त्यांना विचारतो. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळेल, असे अजित पवार म्हणाले आहे.
COMMENTS