चीन । नगर सह्याद्री - सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहे. आज सकाळी चीन आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर 7.3 तीव्रतेचे भूकं...
चीन । नगर सह्याद्री -
सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहे. आज सकाळी चीन आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर 7.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाच्या तीव्र झटक्याने चीन हादरला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 एवढी नोंदवली गेली आहे. चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता तुक्रस्तानमध्ये आलेल्या भूकंपाच्यातुलनेत अधिक होती.
तुर्कस्तानात आलेल्या भूकंपाची तीव्रता 6.9 एवढी होती. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपात 40 हजार पेक्षा जास्त लोंकाना आपला जीव गमवावा लागला.मात्र, या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोरआलेले नाही. सुदैवाने या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
USGS च्या अंदाजानुसार, ताजिकिस्तानमध्ये ज्या भागात भूकंप झाला तो भाग पर्वताच्या शिखरांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत तेथे भूस्खलनही होऊ शकते, तसेच या भागात लोकसंख्या खूपच कमी आहे. मात्र, चीनमधील परिस्थितीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
COMMENTS