मुंबई । नगर सह्याद्री - अमरावती येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी आमदार व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत ...
मुंबई । नगर सह्याद्री -
अमरावती येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी आमदार व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन झाले आहे. सकाळी 9:30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंग शेखावत भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते.
देवीसिंग शेखावत गेल्या दोन दिवसांपासून आजरी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे पुण्यात केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
COMMENTS