कर्नाटक । नगर सह्याद्री - ॲप्पल कंपनीच्या iPhone ची क्रेझ जगभरात पाहायला मिळते. खासकरुन तरुणांमध्ये आयफोनची बरीच क्रेझ पाहायला मिळते आहे. म...
कर्नाटक । नगर सह्याद्री -
ॲप्पल कंपनीच्या iPhone ची क्रेझ जगभरात पाहायला मिळते. खासकरुन तरुणांमध्ये आयफोनची बरीच क्रेझ पाहायला मिळते आहे. मात्र कर्नाटकात आयफोनमुळे एकाचा जीव गेला आहे. एका तरुणाने आयफोनसाठी एका डिलिव्हरी बॉयची हत्या करून त्याचा मृतदेह तीन दिवस घरात ठेवला आहे. मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला आहे. याप्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी एक २०वर्षीय व्यक्ती फ्लिपकार्टच्या वतीने आयफोन डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नव्हते, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आहे. हेमंत दत्ता असे आरोपीचे नाव असून तो आरसेकेरे तालुक्यातील लक्ष्मीपुरम भागातील रहिवासी आहे.
आयफोन डिलिव्हरी करताना दोघांमध्ये पैसे देण्यावरून आणि पार्सल अनबॉक्सिंगवरून वाद झाला. रागाच्या भरात आरोपी दत्ता याने डिलिव्हरी एजंट नाईकचा भोसकून खून केला आहे. यानंतर आरोपींनी मृतदेह एका गोणीत भरून तीन दिवसांनी अंचेकोप्लूजवळ फेकून दिला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी डिलिव्हरी एजंटच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले आहे.
बरेच दिवस झाले तरी पीडित मुलगा घरी परतला नाही म्हणून त्याच्या भावाने पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांना डिलिव्हरी एजंटचा मृतदेह अर्सिकेरे तालुक्यातील अंचेकोप्लू येथे रेल्वे ट्रॅकजवळ पडलेला आढळला आहे. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताच्या नातेवाईकांना बोलावून घेतले आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पोलिसांनी मृताचे फोन कॉल्स ट्रेस केले आणि आरोपींचा शोध घेण्यात यश आले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी व त्याच्या मित्रांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS