आ. संग्राम जगताप यांची ड्रीम सिटीमधील नागरिकांनी घेतली भेट अहमदनगर | नगर सह्याद्री मनपा प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता नगर-कल्याण रो...
आ. संग्राम जगताप यांची ड्रीम सिटीमधील नागरिकांनी घेतली भेट
अहमदनगर | नगर सह्याद्रीमनपा प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता नगर-कल्याण रोडवरील ड्रीम सिटी प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ ड्रीम सिटी मधील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेवून निवेदन दिले. आ. जगताप यांनी या प्रश्नात लक्ष घालून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
नगर-कल्याण महामार्गावर महावीर होम्स ड्रीम सिटी म्हणून प्रकल्प असून या प्रकल्पातील २५० फ्लॅट मधील १५०० नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खालील सह्या करणार ड्रीम सिटी मधील २८० फ्लॅट धारक आपणास निवेदन देत आहे की, ड्रीम सिटी मधील रोज होणारा पाणीपुरवठा मनपा प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केला असून चार दिवसातून एकदाच पाणी देणार असे अधिकार्यांनी सांगितले असून १५ दिवसापासून पाणी एकदाही आलेले नाही. ड्रीम सिटी मध्ये मनपा प्रशासनाने अधिकृत नळ कलेशन दिले असून आम्ही मनपाची पाणीपट्टी व घरपट्टी भरत आहोत. ड्रीम सिटी मध्ये पाण्याचे कनेशन दिले. पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. वास्तविक केडगावला जाणार्या पाईपलाईन वर अनेक अनाधिकृत कनेशन असून त्याबद्दल मनपा प्रशासन कोणतेही लक्ष देत नाही. ड्रीम सिटीला पाणीपुरवठा केला त्यामुळे कोणताही फरक पडला नसताना केवळ राजकीय दृष्ट्या ड्रीम सिटी मधील पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न होत आहे.
मनपा पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांनी केडगाव मध्ये ४ दिवसातून एकदा आम्ही पाणी देत आहोत. तसेच आम्ही ड्रीम सिटीला ही ४ दिवसातून एकदा पाणी देणार आहोत असे सांगितले. वास्तविक केडगाव मध्ये प्रत्येक घराला नळ कनेशन आहे. पण ड्रीम सिटी मध्ये २८० फ्लॅट धारकांना एकच नळ कनेशन आहे. १५ दिवसापासून आमचे पाणी बंद झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी आपणास विनंती आहे की आमच्या मागणीचा विचार करून आपण मनपा प्रशासनाच्या अधिकार्यांना योग्य ते आदेश द्यावेत असे निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS