सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घे...
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच शिवनेरीवरून आणलेल्या ज्योतीची मिरवणूक व महाआरती करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
वडनेर हवेली येथे दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यासाठी दि. १८ रोजी संध्याकाळी सात वाजता कमिटीतील सदस्य शिवनेरीकडे शिवज्योत आणण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. सकाळी ८ वाजता शिवज्योतीचे आगमन झाले. वडनेर हवेली येथे ८ ते १० या वेळामध्ये शिवज्योते ची मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी ८ वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर शिव स्मारक कामाचा उद्घाटन समारंभ करण्यात आला. कामासाठी सुमारे पंधरा ते वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी गावपातळीवर तसेच पंचक्रोशीतून दानशूर व्यक्ती कडून निधीचे संकलन करण्यात येणार आहे. यावेळी सर्व माजी माजी सैनिकांचा गौरव व सन्मान करण्यात आला.
पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.
यावेळी सरपंच लहू भालेकर, उपसरपंच नंदू भालेकर, माजी उपसरपंच राजीव सोनुळे, पोलीस निरीक्षक संदिप बढे, बबलु बढे, सुनील भालेकर, साहेबराव वाळूंज, भास्कर भालेकर, नवनाथ बढे, सौरभ वाळुंज, मोहन भालेकर, राहुल सोनुळे, प्रदीप गाडे, सुनील कुटे, अमोल वाळूंज, भाऊ कुटे, स्वप्निल भालेकर, तात्याभाऊ भालेकर, बाळकृष्ण महाराज, सोनुळे रामकृष्ण भालेकर, बबन कुटे, उत्तम भालेकर, अमोल लटांबळे, आबा रेपाळे, अर्जून भालेकर, शेखर भालेकर, विक्रम भालेकर, योगेश शिंदे, संजय कुटे, संतोष गाडे, प्रकाश कर्डिले, सुदाम कर्डिले, साहेबराव भालेकर, गणेश भालेकर, विलास भालेकर, संदिप राऊत, आमोल बढे, संदीप भालेकर, विकाश गाडे, शिक्षिका आशा साठे आदी उपस्थित होते.
COMMENTS