निघोज येथे शिवजयंती उत्साहात साजरी निघोज | नगर सह्याद्री आई वडीलांनी मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी शिवचरित्र देण्याची गरज असल्याचे प्रतिपाद...
निघोज येथे शिवजयंती उत्साहात साजरी
निघोज | नगर सह्याद्रीआई वडीलांनी मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी शिवचरित्र देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी केले.
निघोज येथे शिवबा संघटना व निघोज ग्रामस्थांतर्फे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व प्रसिद्ध चित्रकार ज्ञानेश्वर कवडे, बबनराव तनपुरे यांनी प्रास्ताविक करताना शिवजयंती उत्सवाची माहिती दिली. यावेळी पाटील उद्योग समूहाचे अध्यक्ष आप्पासाहेब वराळ पाटील यांच्या वतीने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांचा शिवप्रतिमा देउन सत्कार करण्यात आला. शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुते व तमाम समाजबांधवांना एकत्र करून मोठ्या खडतर परस्थितून स्वराज्य निर्माण केले. आई जिजाऊ वडील शहाजीराजे भोसले यांनी आदर्श संस्कार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रप्रेमाची महती सांगत समाज संघटित करण्यासाठी प्रेरणा दिली. मोबाईल व सोशल मिडिया यात आजचा युवक गुरफटला आहे. त्याचा वापर गरजेपुरता होण्याची गरज आहे. आई वडीलांनी मुले पहिलीत गेल्यावर त्यांना शिवचरित्र दिले तर चांगली समाज निर्मीती होईल. त्यातूनच देशसेवेची प्रेरणा मिळेल. शिवबा संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे सकाळी स्वागत करण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मंळगंगा मंदिर परिसर, ग्रामपंचायत चौक, मारुती मंदिर परिसर, नवी पेठ, जुनी पेठ, एसटी बस स्थानक परिसर आदी ठिकाणी विविध संघटना, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज मंडळ, अल्पसंख्याक समाज मंडळ यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. ग्रामपंचायत चौक परिसरात ओमकार रणसिंग व विक्रांत रणसिंग तसेच सहकार्यांनी दांडपट्टा, तलवार चालवणे असे प्रात्यक्षिके केली.
रात्री साडे आठ वाजता मिरवणूक मंळगंगा मंदीरासमोर आल्यानंतर शिवबा संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते तसेच जी आर एल कंट्रशनचे अध्यक्ष गणेश लामखडे, सचिन पाटील वराळ, राजूशेठ लाळगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. महाप्रसादाने शिवजयंतीची सांगता करण्यात आली. उत्सवासाठी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, राजु लाळगे, बबनराव तनपुरे, बबनराव ससाणे, राजु लंके, विश्वास शेटे, रोहिदास लामखडे, शंकर वरखडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, नवनाथ बरशिले, दत्तात्रेय टोणगे, निलेश वरखडे, स्वप्नील जाधव, स्वप्नील लामखडे, खडु लामखडे, तेजस वरखडे, विशाल लामखडे, राहुल शेटे, निलेश लामखडे, अविनाश लामखडे, विजु बोदगे, प्रणव वरखडे, राहुल लहाने, रीतेश वरखडे, किरण राऊत, शांताराम लामखडे, मच्छिंद्र लामखडे आदिंनी तसेच आपला गणपती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, पारनेर तालुका प्रेस फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी जयसिंग हरेल, पारनेर तालुका पत्रकार संघाचे सहसचिव भास्करराव कवाद व त्यांच्या सहकार्यांनी तसेच निघोज ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. शिवजयंती मिरवणुकीत पी एस आय उगले तसेच हेडकॉन्स्टेबल डहाळे तसेच त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS