निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांचे प्रतिपादन निघोज | नगर सह्याद्री शिवजयंती साजरी झाल्यानंतर भगवे झेंडे काढून ते व्यवस्थि...
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांचे प्रतिपादन
निघोज | नगर सह्याद्रीशिवजयंती साजरी झाल्यानंतर भगवे झेंडे काढून ते व्यवस्थित ठेवण्याची गरज असून भगव्याचा मान राखण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी केले आहे.
निघोज ता. पारनेर येथे विद्याधन शिक्षण संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाल विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सांगुन उपस्थीतांची मने जिंकली. पंचवीस पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी छत्रपतींचा इतिहास सांगत उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर ताालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बाराहाते होते. यावेळी माजी पोलीस पाटील पांडुरंग लंके पाटील तसेच विद्याधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, पोस्ट कार्यालयातील लिपिक दिलीप उनवणे, उपसरपंच माऊली वरखडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे सहसचिव भास्करराव कवाद यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी संदीप पाटील फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निघोज व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी तसेच मान्यवर तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन कवाद यावेळी म्हणाले निघोज व परिसरात विविध संस्था तसेच संघटना शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात ही अभिमानाची बाब आहे.मात्र त्यानंतरही झेंड्याची काळजी घेतली पाहिजे.
विद्याधन शिक्षण संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी भास्कर कवाद, भरत डोके, मंदा जाधव, अपेक्षा लामखडे, शिवाजी ढवळे या सर्व शिक्षकांनी व सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम नियोजन केले. शेवटी महाप्रसादाच्या गोड कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पायल लोखंडे व तनुजा पांढरकर यांनी केले शेवटी सर्वांचे आभार शिक्षक भास्कर कवाद यांनी मानले.
COMMENTS