जनसेवा पॅनेलच्या प्रचार रॅलीला सभासद, व्यापारी वर्गाचा मार्केटयार्ड परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री व्यापार, व्यवसाय, उ...
जनसेवा पॅनेलच्या प्रचार रॅलीला सभासद, व्यापारी वर्गाचा मार्केटयार्ड परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्रीव्यापार, व्यवसाय, उद्योजकांना आर्थिक पत देण्याच्या उद्देशाने सुमारे पाच दशकांपूर्वी मर्चंटस् बँकेची स्थापना केली. तेव्हापासून आजतागयत सभासदांनी बँकेवर दृढ विश्वास ठेवला आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीतून जनसेवा पॅनलला भरभरुन मतदान करीत आपला विश्वास व्यक्त केला आहे. अर्थकारणाला चालना देतानाच सर्वोत्तम बँकिंग सेवा मिळत असल्यानेच सभासदांसाठी मर्चंटस् बँक आपली हक्काची बँक वाटते. आताच्या निवडणुकीतही जनसेवा पॅनलचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधियाने विजयी होतील. सभासदांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच जनसेवा पॅनलच्या चांगल्या कारभाराची पोचपावती आहे, असे प्रतिपादन मर्चंटस् बँकेचे संस्थापक चेअरमन तथा जनसेवा पॅनलचे प्रमुख हस्तीमल मुनोत यांनी केले.
अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जनसेवा पॅनलने गुरुवारी सकाळी मार्केटयार्ड येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून भव्य प्रचार रॅली काढली. ठिकठिकाणी फटाके फोडून या रॅलीचे स्वागत करण्यात आले. सभासदांनीही मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग घेत जनसेवा पॅनलच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, नगरसेवक अविनाश घुले, विपुल शेटिया, व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा, रमेश सोनीमंडलेचा, श्रीमल गुंदेचा, प्रकाश गांधी, प्रशांत सोलाट, किरण तुपे, सुभाष चौरे, शांतीलाल गुगळे, पेमराज पोखरणा, रसिकलाल लुणिया, सुभाष गुगळे, अभय गांधी,हिरालाल पोखरणा, सतिश बोगावत, हिरालाल चंगेडिया, राजमल चंगेडिया, नवनीत चंगेडिया, दीपक बोथरा, अजित गांधी, ललित गुगळे, प्रकाश सावंत, नितीन शिंगवी, आनंद चोपडा, अभय लुणिया, प्रितम गांधी, नितीन कटारिया, संतोष गांधी, राजेंद्र ताथेड, डॉ.सचिन बोरा,राजेंद्र गांधी, धन्यकुमार बरमेचा, किरण पोखरणा, महेश गुंदेचा, सर्जेराव गुंड, श्याम निमसे, अनिल लुंकड, योगेश चंगेडिया, किसन गांधी, राजेंद्र पटवा, सतिश गुंदेचा, सुखराम जाजू, बाळू गांधी (भाईजी) आदींसह सभासद, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ व्यापारी शांतीलाल गुगळे म्हणाले की, मर्चंटस् बँक ही व्यापारी वर्गाची हक्काची बँक आहे. बँकेमुळे नगरच्या बाजारपेठेतील अर्थकारणाला मोठी चालना मिळालेली आहे. हस्तीमलजी मुनोत यांचे अनुभवी नेतृत्त्व बँकेला लाभलेले आहे. त्यामुळे त्यांचे जनसेवा पॅनल हे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरणारे आहे. सर्व सभासदांनी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमोल पोखरणा म्हणाले की, मर्चंटस् बँकेची सेवा अतिशय उत्तम आहे. प्रत्येकाला बँकेप्रती आपुलकी व विश्वास आहे. करोना काळातही बँकेने भक्कम साथ देत व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम केले. जनसेवा पॅनलमधील उमेदवार सुशिक्षित व आधुनिक विचारांचे असल्याने सभासद त्यांच्या पाठिशी राहतील असा विश्वास आहे. यावेळी उमेदवार ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, किशोर गांधी, संजीव गांधी, संजय चोपडा, सी.ए. मोहन बरमेचा, संजय बोरा, कमलेश भंडारी, सी.ए.आयपी अजय मुथा, अमित मुथा, किशोर मुनोत, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, सुभाष भांड, विजय कोथिंबीरे, बिनविरोध निवड झालेले सुभाष बायड आदी उपस्थित होते.
संचालक मंडळ निवडणुकीच्या प्रचारार्थ जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार शुक्रवार दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मंगलगेट मारुती मंदिरापासून आडतेबाजार, दाळमंडई, बाजारपेठ परिसरात प्रचार रॅली काढणार आहेत.
COMMENTS