अहमदनगर | नगर सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांची नगर शहरासह जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्या...
छत्रपती शिवाजी महाराजांची नगर शहरासह जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सर्व प्रमुख अधिकारी, विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी नगर शहरातील बसस्थानक परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान, सकाळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व सायंकाळी विविध सहा शिवप्रेमी संघटनांनी शहरातून मिरवणूक काढली.
शिवजयंतीनिमित्त शहरात रुग्णांना फळ वाटप, मनोविकलांग मुलांना साहित्य व कपडे वाटप, रक्तदान शिबिरे, अनाथ मुलांना अन्नदान आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शहरात ठिकठिकाणी प्रमुख चौकांमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पोवाडे, गाण्यांनी परिसर दुमदुमला. सायंकाळी उशिरा शहरात मिरवणूक काढण्यात आली. यात सहा संघटनांनी डीजे लावले होते. पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
COMMENTS