पारनेर | नगर सह्याद्री पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शि...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवार १९ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठया चैतन्यमय, शिवमय वातावरणात संपन्न झाली.
विद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले हे होते. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले व उपप्राचार्य संजय कुसकर, पर्यवेक्षक अंकुश अवघडे, समन्वयक अजित दिवटे, क्रीडा शिक्षक बापूराव होळकर, जेष्ठ शिक्षक जयवंत पुजारी, सतिष फापाळे, मनिषा गाडगे, निर्मला सोबले व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजी राजे, राजमाता जिजाऊ, सोयराबाई, सईबाई तसेच भगवे फेटे परिधान केलेले मावळे यांच्या भूमिका नेत्रदिपक होत्या. विद्यालयातील झांज पथक व लेझिम पथक यांच्या साथीने पारनेर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण पारनेर शहर विद्यालयाच्या भव्य मिरवणुकीने शिवमय झाले होते. नागरिकांनी झांज व लेझीम पथक यांचे मनभरून कौतुक केले. पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजूभाऊ औटी यांनी मिरवणुकीचे मुख्य चौकात स्वागत केले.
मिरवणुकीनंतर विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली सालके यांनी केले तर अनुमोदन संतोष ठाणगे यांनी दिले. या वेळी अनुजा रेपाळे, श्रावणी औटी, स्नेहल थोरात, कार्तिक बोरूडे या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब करंजुले सर यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतात शिवाजी महाराजांचे अनेक प्रसंग सांगून त्यांच्या चारित्र्याचे अनुकरण आपण करावे असे सांगितले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बापूराव होळकर, संतोष पारधी, निलेश पाचारणे, यांनी झांज पथक व लेझिम पथम सादर करण्यास विशेष पारिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला मगर, व संदिप लंके यांनी केले. आभार मंगल पठारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक वृंद व विद्यार्थी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.
COMMENTS