निघोज | नगर सह्याद्री सॉलिसिटर गुलाबराव शेळके व अॅड. उदय शेळके हे आपल्यातून गेले असल्याने समाजाभिमुख संस्थाचा नावलौकिक वाढविण्यासाठी शेळ...
निघोज | नगर सह्याद्री
सॉलिसिटर गुलाबराव शेळके व अॅड. उदय शेळके हे आपल्यातून गेले असल्याने समाजाभिमुख संस्थाचा नावलौकिक वाढविण्यासाठी शेळके कुटुंबाला जनआशिर्वादाची आज खर्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. दिवंगत सॉलीसीटर गुलाबराव शेळके यांच्यानंतर अॅड. उदय शेळके यांनी जी.एस.महानगर बँक वेगळ्या उंचीवर नेली जिल्हा बँकेची अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्यांनी खुप चांगल्या पद्धतीने चालवली या सर्व पदांच्या माध्यमातून स्वतःला ते सिद्ध करत कर्तुत्वाची झेप घेताना त्यांचा अकाली निरोप सर्वांना हेलावुन टाकणारा आहे असे मत काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
पिंपरी जलसेन (ता.पारनेर) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जी.एस.महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगर सह्याद्री व सह्याद्री न्यूज २४ चे संपादक तसेच अहमदनगर प्रेस लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठवलेल्या शोकसंदेशाचे वाचन केले.
यावेळी शेळके परिवारातील सुमनताई शेळके व गिंताजलीताई शेळके, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार सत्यजित तांबे, आमदार मोनिकाताई राजळे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दुर्गाडे, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर, कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके, उद्योगपती राजेश भंडारी, उद्योजक सुरेश पठारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी गवळी साहेब, औरंगाबाद हायकोर्ट प्रसिद्ध वकील रमेश धोर्डे, गांजीभोयरे गावचे माजी सरपंच व सोसायटीचे चेअरमन डॉ. आबासाहेब खोडदे, देवी अंबिका ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, रावसाहेब वर्पे, जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, संचालक बबनराव लंके, सुरेशशेठ डोमे व सर्व संचालक मंडळ, अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया, महानगर बँकेचे माजी संचालक सि. बा. आडसुळ, लक्ष्मणराव गाजरे, महादेव वराळ, जी एस महानगर बँकेचे एम डी कांचन, जी एस महानगर बँकेचे दाते, शांताराम झावरे, रामदास शिंदे, पारनेर कारखान्याचे माजी संचालक दादाभाऊ सोनावळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी सभापती काशिनाथ दाते, पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अशोकराव सावंत, दिपक आण्णा लंके, डी. बी. लाळगे कंट्रशनचे अध्यक्ष दत्तात्रय लाळगे, मंळगंगा कंट्रशनचे अध्यक्ष अमृता रसाळ, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे माजी चेअरमन रामदास वरखडे, दलीत नेते बाळासाहेब गायकवाड, पत्रकार सनी सोनावळे, संजय बारहाते, पोपटराव पाचंगे, भास्करराव कवाद, सुरेश खोसे पाटील, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर, शिरूर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर, मुंबई बँकेचे संचालक नलावडे, गणेश पुरी, गणेश औटी, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम गायकर, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, युवा नेते राहुल शिंदे, सचिन पाटील वराळ, मोहन रोकडे, डॉ. राजेश डेरे, सरपंच मोहन आढाव, सरपंच योगेश झंजाड, शिवाजी वराळ, बबुशा वरखडे, लक्ष्मणराव साळवे, कॅप्टन विठ्ठलराव वराळ, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे, नाना पाटील लंके, आप्पासाहेब लामखडे, रामचंद्र महाराज सुपेकर, पिराजी पवार आदी तसेच नगर, पुणे, मुंबई व राज्यातील विविध भागांतून आलेले मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, जी.एस महानगर बँक,विविध संस्था या मोठ्या कर्तुत्वाने अॅड शेळके यांनी चालविल्या त्यांच्या जाण्याने समाजामध्ये व शेळके परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्यांना आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी गेली सात ते आठ महिन्यांचा काळ शेळके कुटुंबासाठी फारच खडतर गेला. देशाचे नेते शरद पवार साहेब, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व सर्वांनीच शेळके कुटुंबाला आधार दिला. सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब व अॅड. उदय शेळके यांनी संस्थांच्या माध्यमातून फार मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. या संस्था लोकविकासाची जननी आहेत. यातून हजारो कुटुंबे उभी राहिली आहेत. राज्यातील औद्योगिक विकासामध्ये या संस्थांचे योगदान सर्वाधिक आहे. यासाठी शेळके कुटुंबाला आपण सर्वांनी पाठबळ देण्याची गरज असल्याचे आवाहन पवार यांनी केले. नगर सह्याद्री व सह्याद्री न्यूज चॅनलचे संपादक तसेच अहमदनगर प्रेस लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी यावेळी सांगितले की जी एस महानगर बँकेची जबाबदारी गेली सहा वर्षे संभाळीत चेअरमन अॅड. उदयदादा शेळके यांनी सर्वसामान्य जनतेत अढळ स्थान निर्माण केले. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकर्यांच्या विकासासाठी योजना राबवीत त्यांनी जनसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले. जी एस महानगर बँक ही राज्याच्या औद्योगिक विकासाची जननी आहे. यासाठी आपण सर्वांनी शेळके कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिर्के यांनी व्यक्त केले आहे.
चेअरमन डॉ. आबासाहेब खोडदे यावेळी म्हणाले सहकारी संस्थांच्या माध्यमातून विषेश करुन जिल्हा सहकारी बँक व जी एस महानगर बँकेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक आधार मिळाला आहे. गितांजली शेळके यांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून राज्यात पिंपरी जलसेन गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. पारनेरचे नाव राज्यस्तरावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. गितांजली शेळके यांना राजकीय, सामाजिक, सहकाराचे बाळकडू मिळाला आहे. सहकाराचा समर्थ वारसा चालवण्याचे काम त्याच करु शकतात जी एस महानगर बँकेची जबाबदारी त्यांनी घ्यावी अशी मागणी डॉ. खोडदे यांनी करताच उपस्थीतांनी डॉ. खोडदे यांच्या मागणीला दाद दिली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनीही अशाप्रकारे मागणी केली. श्रद्धांजली सभेच्या अगोदर गणेश महाराज वाघमारे यांचे प्रवचन झाले. वाघमारे महाराज यांनी सॉलिसिटर गुलाबराव शेळके, अॅड उदयदादा शेळके यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करीत त्यांची उणीव कधीच भरुन येणार नाही. मात्र समाजाच्या भल्यासाठी आम जनतेने शेळके कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. नगर सह्याद्रीचे संपादक, अहमदनगर प्रेस लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी सुत्रसंचलन केले सर्वांचा ऋणनिर्देश लहु थोरात यांनी केले.
COMMENTS