मुंबई : विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या उर्फी जावेद नेहमीच आपल्या तोकड्या कपड्यांनी चर्चेत असते. तिच्या फॅशन समोर ...
मुंबई : विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या उर्फी जावेद नेहमीच आपल्या तोकड्या कपड्यांनी चर्चेत असते. तिच्या फॅशन समोर भल्याभल्यांनी हात टेकले आहे. नेहमीच थोडे- थाडके कपडे घालणार्या उर्फीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. नुकतेच उर्फीने पुर्ण कपडे घालत बाहेर निघाली आहे. पूर्ण घातलेले कपडे पाहून चक्क महिला व्हिलचेअर वरुन उठत तिला भेटण्यासाठी उठली. सध्या एक उर्फीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उर्फी विमानतळावरून घरी परतताना दिसत आहे. यावेळी तिची एक फॅन समोर येते, जी व्हिलचेअर बसलेली असते. उर्फीला पाहताच ती चकित होते आणि व्हीलचेअर वरून उठत थेट उर्फीला मिठी मारते, तिच्या सोबत सेल्फी काढते. हाच व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडिओवर नेटकर्यांनी प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. ’ही लेडी फॅन चक्क उर्फीला पाहून चालू लागली ही मोठी प्रेरणा आहे’ असेही एकाने म्हटले आहे. तर काहींनी ’जी बाई चालू शकत नाही ती सेल्फी बरी घेऊ शकते’ असं ट्रोल करत म्हटलं आहे. तर अनेकांनी त्या फॅनला टीका करत तिला ट्रोल केले आहे.
COMMENTS