सुपाच्या समर्थ अॅकडमीचे स्नेहसंमेलन उत्साहात पारनेर | नगर सह्याद्री गेल्या अनेक वर्षापासून समर्थ अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घड...
सुपाच्या समर्थ अॅकडमीचे स्नेहसंमेलन उत्साहात
पारनेर | नगर सह्याद्रीगेल्या अनेक वर्षापासून समर्थ अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडविण्यात आले असून तालुयातील नगर व पुणे जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम या समर्थ अकॅडमी केले आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण व कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी समर्थ अकॅडमीचे नावलौकिक जिल्हात असल्याचे गौरवोद्गार आ. नीलेश लंके यांनी सुपाच्या समर्थ अॅकडमीचे स्नेहसंमेलन प्रसंगी काढले.
शैक्षणिक क्षेत्रात सर्व शैक्षणिक उपक्रम राबवत तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण मिळावे हा अट्टाहास असणारे समर्थ अकॅडमीचे संचालक कैलास गाडीलकर हे नेहमीच अग्रस्थानी असतात. विद्यार्थ्याच्या बुुध्यांकांवरुन व त्याच्या अंगी असणार्या विविध कलागुणांची पारख करत त्याला असणार्या आवडीच्या क्षेत्रात नेहमीच व्यासपीठ देत आले आहेत. असे यावेळेस जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोकराव कडूस यांनी सांगितले.
शुक्रवारी १७ फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात श्री. समर्थ अकॅडमीच्या भव्य भारत पेट्रोलियमचे निरंजन यादव, अमित कुमार राय, प्रमोद पाठक, पत्रकार मार्तंडराव बुचुडे, श्रीकांत चौरे, शिवाजीराव पानमंद, सुभाषराव दिवटे, अलिबाग येथील इरिगेशन अभियंता विनायक कुलधर, निता कुलधर, शशिकांत रासकर, सोमनाथ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस यांच्या हस्ते विविध उपक्रमात नाविन्यपूर्ण योगदान देणार्या वद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पारनेरचे नगरसेवक श्रीकांत चौरे यांना नुकताच जाहीर झालेला पत्रकारितेचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणदर्शन कार्यक्रमासाठी परिश्रम घेणार्या समर्थ अकॅडमीच्या तसेच गतवर्षी एज्युकेशन एसलन्स अवार्डने सन्मानित झालेल्या उच्चशिक्षित संचालिका शिल्पा गाडीलकर यांचे जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देठे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भामरे व ठुबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य गणेश देठे यांनी परीश्रम घेतले.कैलास गाडीलकर यांनी मांनले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आ. लंके यांची कौतुकाची थाप
समर्थ अकॅडमीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यामध्ये त्यांना स्वतःचे अस्तित्व कसे सिद्ध करता येईल. विद्यार्थी मित्रांना प्रेरणादायी शिक्षण व कलागुणांना कसा वाव मिळेल याचा विचार करत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत आसतात. व त्यातुन सर्वाधिक मुलांना बक्षीस पात्र कसे करता येईल या उद्देशाने उपक्रम राबवले जातात याचे समाधान वाटते. जे विद्यार्थी वर्षभर मेहनत घेत असतात त्याची कौतुकाची थाप मिळाल्यास विद्यार्थी त्या क्षेत्रात नव्या उमेदीने कार्यरत होतो. व तो यशस्वी प्रयत्न गाडीलकर या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातुन नेहमीच सिद्ध करत आले आहेत, असे आमदार नीलेश लंके म्हणाले.
COMMENTS