साईदीप हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिरांना प्रारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री उच्च दर्जाच्या नियमित आरोग्य सेवा, सुसज्ज इमारत, स...
साईदीप हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिरांना प्रारंभ
अहमदनगर | नगर सह्याद्रीउच्च दर्जाच्या नियमित आरोग्य सेवा, सुसज्ज इमारत, सर्व आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध केल्याने अल्पावधित साईदीप हॉस्पिटलने नावलौकिक मिळविला, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी केले.
साईदीप हॉस्पिटलने चार वर्ष पूर्ण करून पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ओला बोलत होते. द्वीप प्रज्वल्लन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. या वेळी साईदीप हॉस्पिटल चेअरमन ड़ॉ. दीपक एस. एस. व सर्व संचालक डॉटर्स, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, मोहनसेठ मानधना, ऍडवोकेट किशोर देशपांडे, शरद मुनोत, दिलीप बोरा, के. के. शेट्टी, मुरलीधर बिहाणी, राहुल चंगेडे, ड़ॉ. अविनाश मोरे, गणेश कोलार आदी उपस्थित होते. ओला म्हणाले, हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या आजाराचे योग्य निदान वेळेत करुन योग्य उपचार महत्वाचे असतात.यावर रूग्णांचा विश्वास बसल्याने अर्थात त्यांचे दुखणे दूर होवून त्यांना आराम मिळाला की उपचार करणारे डॉटर पेशंटचे देव आणि हॉस्पिटल आरोग्य मंदिर बनते, जसे साईदीप हॉस्पिटल झाले आहे. आमच्या पोलिस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी साईदीपमध्ये उपचार घेतात. कोविड काळातही अनेकांचे जीव साईदीपने वाचवले.
प्रास्ताविकात डॉ. दीपक म्हणाले, सर्व संचालक डॉटर्सच्या पाठबळामुळे साईदीपची निर्मिती करून चार वर्षात उच्चप्रतिचे उपचार व सर्व आरोग्य सेवा अविरतपणे उपलब्ध करणे शय झाले. प्रामुख्याने कर्मचारी यांची मेरिटवरील कामगिरी आणि डॉटर्सनी प्रमाणिकपणे बहाल केलेली रुग्णसेवा, कोविड काळातही साईदीप हॉस्पिटलमध्ये ऑसिजन उपलब्धता आणि हॉस्पिटल अंतर्गत वितरणामुळे अनेकांचे जीव वाचले. त्यावेळी राज्य सरकारने दखल घेऊन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनेचे कौतुक केले. सर्व कर्मचारी, सहकारी डॉटर्स आणि स्वच्छता कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. येणार्या काळात साईदीपमध्ये अनेक नवीन व प्रगत उपचार पद्धती सुरु करण्याचा मानस आहे.
डॉ. आर. आर. धूत म्हणाले, हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विविध व्याधींवरवर मोफत उपचार होतात. यामुळे गरजू लोकांना महागड्या आरोग्य सेवा प्रदान करता आल्या. साईदीप हॉस्पिटलमधील ज्येष्ठ संचालक डॉटर्स यांच्यानंतर आमची दुसरी पिढी चांगली कामगिरी करीत असून येणार्या काही वर्षात तिसरी पिढीही आरोग्यसेवेचे व्रत घेऊन सेवा देण्यास तयार असेल. सूत्रसंचालकन डॉ. संगीता कुलकर्णी यानी केले. डॉ. कैलास झालानी आभार मानले. कार्यक्रमास साईदीप हॉस्पिटलचे सर्व संचालक ड़ॉ निसार शेख, ड़ॉ श्यामसुंदर केकड़े, ड़ॉ रविन्द्र सोमाणी, डॉ व्ही एन देशपांडे, ड़ॉ अनिलकुमार कुरहाड़े, डॉ हरमीत कथूरिया,ड़ॉ किरण दीपक, ड़ॉ राहुल धूत, ड़ॉ एस एम इक़बाल, ड़ॉ अश्विन झालानी, सौ ज्योति दीपक, ड़ॉ वैशाली किरण तसेच ड़ॉ शिरीष कुलकर्णी, ड़ॉ. रजिया निसार, डॉ. श्रीधर बधे, ड़ॉ. मानसी बधे, ड़ॉ. भूषण खर्चे, डॉ. संजय असनानी, ड़ॉ. सुहास घुले, ड़ॉ. स्वाती घुले, डॉ. धनंजय वाघ, डॉ. सुमा वाघ, ड़ॉ. संगीता धूत, ड़ॉ. साहिल शेख, ड़ॉ. मेहवाश साहिल, हे निमंत्रित डॉटर्स उपस्थित होते साईदीप ट्रस्ट च्या सर्व महिला संचालिका, नंदा सोमाणी, ज्योति दीपक, अंजू कथूरिया, अनिता झालानी, रोहिणी कुरहाड़े, सुनीता देशपांडे, सीमा शेख, रेसिडेंट डॉटर्सच्या वतीने ड़ॉ. विकास लबडे, नर्सिंग स्टाफ़च्या वतीने सौ.छाया पंडित आणि भारत विकास ग्रुपच्या वतीने सौ. कांचन बिडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी साईदीप हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
COMMENTS