मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान ...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण रणवीर सिंगला बॉलिवूडमध्ये एंट्री कोणामुळे मिळाली याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. रणवीर सिंगने नुकतंच त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगितलं. नेटफ्लिस शो द रोमँटिस’मध्ये रणवीरने त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल मोठा खुलासा केला आहे. रणवीर सिंहने सांगितलं की त्याला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळण्यात भूमी पेडणेकरचा मोठा वाटा आहे. त्यावेळी भूमीने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. रणवीरने सांगितलं की, कास्टिंग डायरेटर शानू शर्माने त्याचे फोटो निर्माता आदित्य चोप्राला दाखवले होते. पण त्यांना मी त्यावेळी काही खास चांगला दिसतोय असं वाटलं नव्हतं. पण कास्टिंग डायरेटरच्या आग्रहामुळे माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. रणवीरने सांगितलं की ते सीन मला शानूच्या असिस्टंटने समाजावले होते आणि ती दुसरी तिसरी कोणी नाही तर भूमी पेडणेकर होती. रणवीर म्हणाला, ती खरंच खूप प्रोफेशनल होती. तिने माझ्यासाठी बर्याच गोष्टी सोप्या केल्या. तिने माझ्यासाठी सीन्समध्ये माझ्या सहकार्याची भूमिका साकारली. भूमीमुळेच मी बँड बाजा बारात’साठी मी एवढी चांगली ऑडिशन देऊ शकलो होतो. आदित्य चोप्राने ही ऑडिशन पाहिल्यानंतर मला लगेचच चित्रपटासाठी निवडलं होतं. दरम्यान यश चोप्रा यांच्या स्मरणार्थ १४ फेब्रुवारीला द रोमँटिस’ची सुरुवात झाली. हा कार्यक्रम जागतिक स्तरावर प्रदर्शित झाला आहे. यश चोप्रा यांना रोमँटिक चित्रपटांचे जनक म्हटले जाते. या शोचे दिग्दर्शन स्मृती मुंद्रा यांनी केले होते.
COMMENTS