जनसेवा पॅनलच्या प्रचार रॅलीला सभासद, व्यापारी वर्गाचा आडतेबाजार, दाळमंडई परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री सहकारी बँकिंग ...
जनसेवा पॅनलच्या प्रचार रॅलीला सभासद, व्यापारी वर्गाचा आडतेबाजार, दाळमंडई परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्रीसहकारी बँकिंग क्षेत्रात तब्बल ५५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव हस्तीमलजी मुनोत यांना आहे. त्यांनी अतिशय दूरदृष्टीने मर्चंटस् बँकेची स्थापना करून व्यापार, व्यवसाय, उद्योगांना बरकत आणण्यात योगदान दिले आहे. नगरच्या बाजारपेठेचा नावलौकिक वाढण्यात मर्चंटस् बँकेचेही मोठे योगदान आहे. जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार एका उच्च ध्येयाने प्रेरित होवून काम करणारे आहेत. त्यामुळे सभासद दरवेळी प्रमाणे यंदाही त्यांच्या पाठिशी राहतील व जनसेवा पॅनलच्या समर्थ हातातच बँकेची सत्ता सोपवतील असा विश्वास बँकेचे ज्येष्ठ सभासद व्यापारी चांदमल ताथेड यांनी व्यक्त केला.
अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी आज शुक्रवारी माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. यावेळी गुरु संगमनाथ महाराज यांनी सर्वांना आशिर्वाद दिले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त उपस्थित होते. यानंतर मंगलगेट मारुती मंदिरात नारळ वाढवून भव्य प्रचार रॅली काढली. आडतेबाजार, दाळमंडई परिसरात ठिकठिकाणी फटाके फोडून या रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी हस्तीमलजी मुनोत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. मंगलगेट, आडतेबाजार, तपकिर गल्ली, दाळमंडई, वंजारगल्ली, तेलीखुंट, कापडबाजार मार्गे जैन मंदिरासमोर रॅलीचा समारोप झाला.
यावेळी नगरसेवक सचिन जाधव, तालीम संघाचे वैभव लांडगे, कचरदास लुंकड, सत्यनारायण झंवर, राजू तोडकर, महावीर बडजाते, सचिन कटारिया, मनोज राका, बजरंग दरक, सुशिल भळगट, प्रदीप बोरा, दीपक तलरेजा, अनिल अनेचा, परितोष मुथा, महावीर कटारिया, पोपटलाल भंडारी, रतिलाल कटारिया, बाबूशेठ लोढा, विलास गांधी, हिरालाल चंगेडिया, अरविंद गुंदेचा, डॉ.विजय भंडारी, हिरालाल पोखरणा, किशोर(पीटू) बोरा, कुंतीलाल राका, नरेश फिरोदिया, अश्विन गुजराथी, बाळूशेठ गुगळे, संतोष ताथेड, संजय लोढा, पप्पू मुंदडा, योगेश मुथा, मिठुलाल भंडारी, धन्यकुमार बरमेचा, बाबालाल गांधी, विनय भांड यांच्यासह माहेश्वरी युवक मंडळ, जय आनंद फौंडेशन, महावीर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.जनसेवा पॅनलप्रमुख हस्तीमलजी मुनोत म्हणाले की, मर्चंटस् बँकेत अनेक नवीन सभासद झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदान ७० टक्क्यांच्या पुढे जाईल असा विश्वास आहे.
मर्चंटस् बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा जनसेवा पॅनलचे उमेदवार अनिल पोखरणा यांनी सांगितले की, व्यापार, व्यवसाय, उद्योजकांना आर्थिक पत देण्याच्या उद्देशाने सुमारे पाच दशकांपूर्वी मर्चंटस् बँकेची स्थापना केली. तेव्हापासून आजतागयत सभासदांनी हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवला आहे. अर्थकारणाला चालना देतानाच सर्वोत्तम बँकिंग सेवा मिळत असल्यानेच सभासदांसाठी मर्चंटस् बँक आपली हक्काची बँक वाटते. आताच्या निवडणुकीतही जनसेवा पॅनलचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधियाने विजयी होतील. सभासदांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच जनसेवा पॅनलच्या चांगल्या कारभाराची पोचपावती आहे. सर्व सभासदांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन पोखरणा यांनी केले. यावेळी उमेदवार आनंदराम मुनोत, किशोर गांधी, संजीव गांधी, संजय चोपडा, सी.ए. मोहन बरमेचा, संजय बोरा, कमलेश भंडारी, सी.ए.आयपी अजय मुथा, अमित मुथा, किशोर मुनोत, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, सुभाष भांड, विजय कोथिंबीरे, बिनविरोध निवड झालेले सुभाष बायड आदी उपस्थित होते.
COMMENTS