मर्चंटस् बँक निवडणूक प्रचारार्थ जनसेवा मंडळाचा औरंगाबादेत सभासद मेळावा अहमदनगर | नगर सह्याद्री कोणत्याही आर्थिक संस्थेस स्पर्धेच्या युगात ट...
मर्चंटस् बँक निवडणूक प्रचारार्थ जनसेवा मंडळाचा औरंगाबादेत सभासद मेळावा
अहमदनगर | नगर सह्याद्रीकोणत्याही आर्थिक संस्थेस स्पर्धेच्या युगात टिकायचे तर शिस्तबध्दता हवी असते. अहमदनगर मर्चंटस् बँकेने स्थापनेपासून हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबध्द कारभार केला आहे. जनसेवा मंडळाचे सर्व उच्च शिक्षित व तज्ज्ञ सदस्य विश्वस्त भावनेने सभासद, ग्राहक हिताचा कारभार करतात. औरंगाबाद येथील शाखेतूनही आदर्श कारभार व उत्कृष्ट आधुनिक बँकिंग सेवा ग्राहकांना मिळते. त्यामुळे या निवडणुकीत जनसेवा मंडळाचा विजय हा औपचारिकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सभासद नवनीतमल चुत्तर यांनी केले.
नगर मर्चंटस् को ऑप.बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी औरंगाबाद येथे सभासद मेळावा घेऊन भूमिका मांडली. यावेळी सभासद हिरालाल भंडारी, कांतीलाल मुथियान, सुभाष सुराणा, उपमहापौर प्रशांत देसरडा, बँकेचे संस्थापक चेअरमन तथा जनसेवा मंडळाचे प्रमुख हस्तीमलजी मुनोत, उमेदवार ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा, किशोर गांधी, संजीव गांधी, संजय चोपडा, सी.ए. मोहन बरमेचा, संजय बोरा, कमलेश भंडारी, सी.ए.आयपी अजय मुथा, अमित मुथा, आनंदराम मुनोत, किशोर मुनोत, प्रमिलाताई बोरा, मीनाताई मुनोत, सुभाष भांड, विजय कोथिंबीरे, बिनविरोध निवड झालेले सुभाष बायड आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल पोखरणा यांनी बँकेच्या वाटचालीची माहिती देताना सांगितले की, हस्तीमलजी मुनोत यांच्यासारखे दूरदृष्टीचे व अभ्यासू नेतृत्व लाभल्याने सहकारी बँकिंगमध्ये मर्चंटस् बँकेची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. व्यापार, उद्योग, व्यवसायाला चालना देत अर्थकारण गतिमान करण्याच्या दृष्टीने बँकेने नेहमीच प्रयत्न केले आहेत. काळानुरुप बदल अंगिकारत आधुनिक तंत्रज्ञान युक्त बँकिंग सेवा ग्राहकांना दिली जाते. कर्तव्यदक्ष सहकारी संचालकांना सोबत घेऊन हस्तीमलजी मुनोत कारभार करीत असतात. त्यामुळे जनसेवा मंडळाला सभासदांचा दर निवडणुकीत उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो. उपमहापौर प्रशांत देसरडा म्हणाले की, नगरला मुख्यालय असलेल्या मर्चंटस् बँकेला उत्कृष्ट कारभाराची परंपरा आहे. स्पर्धेच्या युगात योग्य बदल अंगिकारून बँकींग सेवेचे वेळोवेळी अत्याधुनिकीकरण करण्यावर बँकेने भर दिला आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांनाही ही आपली हक्काची बँक वाटते. यावेळी सी.ए.आयपी अजय मुथा, संजीव गांधी यांनीही सभासदांशी संवाद साधत बँकेच्या कामकाजाची माहिती दिली. या मेळाव्याला औरंगाबाद येथील बँकेचे सभासद उपस्थित होते.
COMMENTS