दत्ता उनवणे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या विकासासाठी खा. सुजय विखे पाटील यांना तालुक्यातील जनतेचा प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. त्या...
दत्ता उनवणे | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याच्या विकासासाठी खा. सुजय विखे पाटील यांना तालुक्यातील जनतेचा प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. त्यांच्याकडूनसर्वसामान्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याने हा प्रतिसाद वाढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेचा सर्वाधिक फायदा नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ लोकांना झाला. फक्त पारनेर तालुयातील वीस हजारपेक्षा जास्त कुटुंबातील लोकांना याचा फायदा मिळवून देण्यासाठी खासदार डॉ. विखे पाटील यांचे समर्थक यशस्वी झाले. पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती देत खा. विखे पाटील यांनी जिल्हाभरात मेळावे घेतले. २०२२ ते २३ वर्षात तालुयातील बहुसंख्य गावात भाजपची धोरणे व पंतप्रधान मोदी यांचे लोकपयोगी सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम लोकांना कसे फायदेशीर आहेत, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात खा. विखे पाटील यशस्वी होत आहेत. भाजपचे संघटन ग्रामीण जनतेपर्यंत मजबूत करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. २०२४ ला लोकसभा व विधानसभा निवडणूक होण्याची शयता आहे. बहुतांश राज्याच्या विधानसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. या निवडणूका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. खा. विखे पाटील यांचा जनसंपर्क, ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना, महसूल विभागाकडून सुरू करण्यात येणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम लोकहिताचा होत असून यासाठी खा. डॉ. विखे पाटील यांनी व्यूहरचना सुरू केली आहे. पारनेर तालुयातील आळकुटी येथील कार्यक्रमात सर्व पक्षीय कार्यकर्ते दिसून आले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना गृहित धरून खासदार डॉ. विखे पाटील विखे पॅटर्न किती प्रभावीपणे राबवतात, ही झलक या निमित्ताने पहायला मिळत आहे. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची ही चाणय नीती त्यांचे नातू अवलंबीत आहेत. नव्या जून्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून तसेच ईतर पक्षीयांना कार्यक्रमात सहभागी करुन घेत भाजपच्या तालुयातील नेतेमंडळींना सुद्धा ते आदराचे स्थान देतात.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे समर्थक जरी आपल्या पासून दूर गेले असले तरी या संपर्क दौर्यात ते कधी ना कधी आपल्या बरोबर नक्की येउन विखे पाटील यांच्या राजकीय प्रवाहात सामील होतील ही अपेक्षा ठेवून खासदार कार्यरत आहेत.खासदार डॉ विखे हे बाळासाहेब विखे पाटील यांची राजकीय चाल हाताळीत असून अळकुटी येथील खासदारांच्या दौर्यात हेच निदर्शनास आले.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच २०२४ मध्ये होणार्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे यशस्वीपणे तयारी करीत आहेत.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत याची चुणूक ते दाखवतील तसेच आगामी राज्य व केंद्र स्तरावरील निवडणुकीत तेच यशस्वी होतील अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
तालुयातील असंख्य कार्यकर्ते व नेते मंडळींना बरोबर घेण्याचे धोरण खासदार डॉ.विखे राबवीत आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख बंडूशेठ उर्फ विकास रोहकले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, माजी तालुका अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा नियोजन जलसंधारण समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे, डॉ, भाऊसाहेब खिलारी, सुप्याचे सरपंच दत्ताशेठ (नाना)पवार, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखीले, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्यासहीत तालुयातील शेकडो कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून फार मोठा विकास निधी त्यांनी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दिला आहे. एकच उदाहरण द्यायचे झाले तर निघोज - आळकुटी - गारखिंडी रस्त्यासाठी १२ कोटी,निघोजच्या स्वच्छ पाणीपुरवठा योजनेसाठी ३० कोटी रुपये,निघोजच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प योजनेसाठी एक कोट रुपये, तसेच दहा ते पंधरा कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. अशाप्रकारे फक्त निघोज, आळकुटी जिल्हा परिषद गटाचा विचार केल्यास येत्या दोन महिन्यांत सत्तर कोटींची विकासकामे मार्गी लागणार आहेत. अशाप्रकारे केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेचा फायदा विखे पाटील तालुयातील जनतेला मोठ्या प्रमाणात देत असून आजपर्यंत खासदार डॉ. विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेचे ४० कोटी रुपयांचे साहित्य वाटप केले आहे. हा देशातील विक्रम म्हटले तरी वावगे ठरणार नाही, अशी कर्तबगार कामगीरी खासदार डॉ सुजय विखे पाटील करीत आहेत.
अळकुटी ग्रामपंचायत ही शिवसेनेच्या ताब्यात आहे, असे असतानाही खा. डॉ.विखे पाटील यांनी जलजिवन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी दिड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हीच किमया त्यांनी तालुयातील अनेक गावांत घडवून आणली.जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल व दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकासनिधीतुन विकासकामे केली.शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर कार्यकर्ता भाजपचा आहे की कोणत्या पक्षाचा याचा विचार न करता आपण लोकांसाठी विकासकामे करतो हे दाखवून दिले. तालुयातील बहुसंख्य गावांसाठी शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची कामे मंजूर करुन आणली आहेत. हीच पद्धत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची होती,अशीच प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
COMMENTS